लिंबू-पाणी पिण्याचे फायदे | lemon juice for health

 
lemon juice for health

लिंबू-पाणी / Lemon juice

लिंबू हे अतिशय स्वस्त व सर्वसामान्यांना उपलब्ध असणारे संत्रा (Citrus) वर्गीय फळ आहे.
आरोग्य दृष्ट्या लिंबू अतिशय उपयुक्त असे फळ आहे. 
लिंबाचा रस म्हणजेच लिंबू पाणी हे उन्हाळ्या बरोबरच संपुर्ण वर्षभर सुद्धा आहारात समाविष्ट करता येते. 

लिंबातील घटक : 

+ लिंबामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम अन फायबर व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न सामावलेले असतात. 

लिंबू पाण्याचे सेवन कसे करावे 

+ लिंबू पाण्यासोबत सेवन करनेच फायदेशीर आहे.

+ बऱ्याच जणांना लिंबू मीठ लावून खाण्याची सवय असते. ती शरीरासाठी अत्यंत अपाय कारक आहे कारण लिंबू आणि मिठाच्या एकत्रित सेवनाने तुमच्या दाताला हानी पोचण्याचा संभव असतो.

+ सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिल्याने तुमच्या आरोग्याला हे वरदानच ठरेल. 

+ परंतु लिंबू पाणी पिल्या नंतर १५ मिनिटे आपण अन्य कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये म्हणजे लिंबू पाणी पिल्याचे फायदे होतील.

लिंबू पाणी शरीरात चैतन्य वाढवते : 

+ लिंबू पाणी पिल्याने अनावश्यक करपट ढेकरा कमी होण्यास मदत होते. 

+ शरीराची ऊर्जा वाढवून नैराश्य कमी करण्यासाठी लिंबू पाणी मदत करते.

रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते : 

+ लिंबात व्हिटॅमीन सी मुबलक प्रमाणात असते आणि व्हिटॅमीन सी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. 

+ आपण जेव्हा तणावाने आजारी पडतो तेव्हा आपल्या शरीरात व्हिटॅमीन सी कमी पडते ते लिंबू पाणी पिल्याने मिळते.

पचनशक्तीसाठी लाभदायक :

+ सकाळी लिंबू पाणी पिल्याने आतड्यात साठलेले टॉक्सिन्स कमी होते. 

+ त्यामुळे पचन क्रिया सुधारते. 

+ पोट साफ होण्यास फायदा होईल. 

+ लिंबूपाण्याचे नियमित सेवन ऍसिडिटी कमी करण्यास मदत करते.

त्वचा तजेल दिसू लागते :

+ लिंबू पाणी पिण्याने त्वचा तजेल बनते. 

+ लिंबात अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

अशाप्रकारे लिंबू हे अतिशय उपयुक्त व आरोग्यदायी फळ आहे हे लक्षात येते.