उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल? | skin care in summer

उन्हाळा आणि  त्वचा 


skin care in summer


उन्हाचे त्वचेवरील परिणाम

+ उन्हाळ्यात त्वचा ऊन व घामामुळे तेलकट होते. 

+ त्वचा काळवंडणे, घामोळ्या येणं, खाज सुटणं, काळे चट्टे येणं असे अनेक त्रास उद्भवू शकतात.

+ या सूर्यकिरणांच्या संपर्कात त्वचा आल्यामुळे प्रीमॅच्युअर एजिंग म्हणजेच त्वचेवर वार्धक्याच्या खुणा लवकर दिसू लागतात. 

+ त्वचेवरील नव्वद टक्के सुरकुत्या उन्हामुळे पडतात.
 
+ प्रदूषणाला व सूर्यकिरणांना सतत सामोरा जाणारा शरीरावरील अत्यंत संवेदनशील भाग म्हणजे त्वचा. म्हणूनच एखादी व्यक्तीला सनबर्न होऊ शकतो. 

+ सनबर्नमुळे त्वचेवर लाल रंगाचे चट्टे उमटतात किंवा त्वचा भाजल्यासारखी होते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणंच योग्य ठरते.

+ भारतीयांची त्वचा टाइप lV आणि V मध्ये येते. कारण आपल्या त्वचेत melanim, रंग बनवणाऱ्या पेशी जास्त आहेत व या पेशी आपल्या त्वचेची सुरक्षा करतात. 

+  या उलट विदेशी खास करून युरोपियन, अमेरिकन हे जास्त गोरे असल्यामुळे टाईप I व III मध्ये येतात. त्यांच्यात melanim व रंग बनवणाऱ्या पेशी कमी असतात. 

+ म्हणूनच त्यांच्या त्वचेवर सूर्यकिरणांमुळे होणारे बदल जास्त दिसतात व सूर्यकिरणांमुळे होणारे त्वचेचा कर्करोग ही जास्त प्रमाणात आढळतात.

त्वचेची काळजी कशी घ्याल 

काही उपाययोजना केल्यास आपली त्वचा सुरक्षित ठेवता येऊ शकते

# उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता असते. भरपूर पाणी असणारी फळं सेवन करण्याची आवश्यकता असते. 

* जसं टोमॅटो, काकडी, द्राक्षे, खरबूज, टरबूज इत्यादी. 

# उन्हाळ्यात जास्तीत जास्त सुती 
कपडे वापरण्यावर भर द्यावा. फिकट रंगाचे कपडे घालावे. पूर्ण बाह्याचे कपडे किंवा तरुणींनी सनकोट, सुती स्टोल वापरावे. 

# हवी असल्यास जवळ छत्री बाळगावी. डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून गॉगल वापरावे. 

# सूर्यकिरणांच्या संपर्कात त्वचा आल्यामुळे मॉइश्चर कमी होते, त्वचा कोरडी वाटल्यास मॉइश्चराइझर लावून त्वचा मऊ ठेवावी. 

# उन्हाळ्यात सनस्क्र‌नि लोशनचा वापर करावा. त्वचेवर चांगल्या दर्जाचे सनस्क्र‌नि लावा. 

# उन्हाळ्यात एक बादली कोमट पाण्यात दोन थेंब लिंबूरस टाकून महिनाभर आंघोळ करावी. त्यामुळे त्वचेचा रंग साफ होतो.

# सकाळी उपाशीपोटी गाजरचा रस घ्यावा. अपचन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या, चहा आणि कॉफीचे सेवन मात्र कमी करा.

# दोनवेळेचं जेवण झाल्यानंतर थोडीशी बडीशोप खावी. त्यामुळं त्वचेचा रंग उजळतो.

# अजून काही टिप्स : हळद पॅक, मध-बदाम स्क्रब, चंदन, केसर पॅक, मसुरदाळ पॅक, बेसन पॅक यासारखे पॅक वापरणे केव्हाही चांगलेच.

    अशाप्रकारे उन्हाळ्यात आपल्या त्वचेची साधे सोपे व घरगुती उपाय करून काळजी घेऊ शकतो.