सूक्ष्म पोषक अन्नद्रव्ये कोणती आहेत? | Micro Nutrients mahiti in marathi

Micro Nutrients mahiti in marathi


सूक्ष्म पोषक अन्नद्रव्ये

Micro Nutrients 

बद्दल समजून घेऊया. हे लागतात कमी प्रमाणात पण खूप महत्त्वाचे असतात.


 Vitamins 

एकुण १३ प्रकारची Vitamins गरजेची असतात. यांचे दोन प्रकार असतात:

१. Fat Soluble- चर्बीत विरघळणारे.

२. Water Soluble - पाण्यात विरघळणारे.


Fat Soluble Vitamins

 विषयी जाणून घेऊया.


Vitamin A - 

दात, हाडे, अवयवांना जोडणारे उती (tissues) तसेच आंतरीक व बाह्य त्वचा यांच्या उत्पत्ती आणि दुरुस्ती साठी हे आवश्यक असते.


Vitamin D - 

कॅल्शियम शोषून घेऊन ते दात व हाडां पर्यंत पोहोचवण्याचे काम करते.


Vitamin E - 

डोळे व त्वचेचे स्वास्थ्य आणि रोगप्रतिकारक शक्ती साठी महत्वाचे असते.


Vitamin K - 

रक्त प्रवाह सुरळीत ठेवणे, रक्ताची योग्य घनता राखणे आणि जखम झाल्यास रक्त साकळवून जखमेतून रक्तस्राव रोखण्याचे महत्वाचे कार्य करते.


Water Soluble Vitamins

विषयी जाणून घेऊया.


Vitamin B

याचे सर्व उपप्रकार (B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12) ज्यांना आपण B-complex म्हणून ओळखतो, यांचे कार्य आहे लाल रक्तपेशी बनवणे. याच बरोबर या प्रत्येक उपप्रकाराची वैयक्तिक कार्य पण आहेत.

  1. B1 - Carbohydrates चे रुपांतर energy मध्ये करण्यासाठी.
  2. B2 - शरीराच्या वाढ आणि विकासासाठी आवश्यक.
  3. B3 - त्वचेच्या स्वास्थ्यासाठी गरजेचे.
  4. B5 - चयापचय क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करते.
  5. B6 - मेंदूच्या कार्यात मोलाचे योगदान देते.
  6. B7 - Hormones तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे.
  7. B9 - DNA च्या रचनेच्या प्रक्रियेसाठी महत्वाचे. 
  8. B12 - मज्जासंस्थेच्या कार्यासाठी अत्यावश्यक.


Vitamin C 

हे vitamin बहुआयामी आहे. दात आणि हिरड्यांच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक. जखम भरण्याच्या कामात मदत करते. तसेच रोगप्रतिकारक शक्तीला बळकटी देते.