उन्हाळ्यात पक्षांची काळजी - कशी घ्या | bird care in summer

 

पक्षी वाचवा !

bird care in summer


उन्हाळ्यात पक्षांची काळजी कशी घ्याल
bird care in summer

 

सांस्कृतिक वारसा 

मुक्या वन्य जीवांची काळजी घेणे ही आमची जूनी संस्कृती आहे. 

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी,  पक्षीही सुस्वरे आळविती,

या संत तुकारामांच्या अभंगातील ओळी वाचल्यानंतर संतांनी किती व्यापक विचार करून ठेवलीय याची कल्पना येते. 

भारतीय संस्कृतीच मुळात प्रत्येक जीवात ईश्वराचा अंश आहे असे माणणारी आहे. त्यामूळे मानवता भुतदया पर्यावरण संरक्षण हे आपले सनातन मुल्य आहेत. आम्ही संतांच्या शिकवणूकीचे पारायणे करतो. पांठांतर करतो परंतू त्यांची शिकवणूक समजण्यात व अंगीकारण्यात कमी पडतो.

उन्हाळ्यात पक्षांची काळजी -  का गरजेची

उन्हाळ्यात सर्वत्र पाण्याची भिषण टंचाई असते. झाडांना पाने रहात नाहीत. अनेक झाडे वाळून जातात. गुरांना चारा नाही उष्णतेचा पारा चाळीस से. च्यावर वर जातो. गावागावात टँकरणे पाणी पुरवठा चालू होतो. जनावरांसाठी चारा छावण्या चालू कराव्या लागतात. पण हे झालं मानव व पाळीव प्राण्यांच वन्य पशू व पक्षांचं काय. त्यांची काळजी कोण घेणार. 'bird care in summer'

रानात ना पाणी असते न चारा. अन म्हणून हजारोंच्या संखेनं पक्षांनी आज गावांतील व शहरांतील झाडांचा आश्रा घेतलाय. 

तसे दरवर्षीच पक्षी उन्हाळ्यात चारा व पाण्याच्या शोधात गावांजवळा वस्ती करतात. परीस्थीती अतिशय भिषण असते.

शासकीय व NGO चे तोकडे प्रयत्न 

ज्या वनविभागावर वन्य पशुपक्ष्यांच्या चारापाण्याची सोय करण्याची जबाबदारी आहे त्याचे प्रयत्न कमी पडतात. 

अनेक स्वयंसेवी संस्था व समाजतील व्यक्ती याकामी पुढाकार घेतायत. परंतू एक दोघाने नव्हे तर सर्वानी या दुष्काळात पक्षांच्या चारा पाण्याची सोय करून त्यंना वाचविण्याची आवश्यकता आहे.

पक्षी - शेतकरी व निसर्गाचे मित्र  

निसर्ग वाचला तर मानव वाचेल. पक्षी हे निसर्गाचाच एक भाग आहेत. अन्न साखळीत त्यांना महत्वाचे स्थान आहे. 

पक्षी हे शेतक यांचे मित्र आहेत. अनेक प्रकारच किटक खावून ते पिंकाचे होणारे नूकसान वाचवतात.

पक्षी परागिभवनाचे एक महत्वाचे माध्यम आहेत. त्याच बरोबर पक्षी हे उत्तम नैसर्गिक माळी आहेत. त्यांनी खाल्लेल्या फळांच्या बिया विष्टेद्वारे अनेक ठिकाणी पडतात व त्यातून वनांची निर्मिती होते. अशा कित्येक प्रकारे पक्षी मानवाच्या व निसर्गाच्या उपयोगी येतात. 

आणि म्हणूनच या संकटाच्या प्रसंगी त्यांना आधार देणे आवश्यक आहे.  

सामाजिक जबाबदारी : bird care in summer

प्रत्येक व्यक्तिने मग लहान असो वा मोठी शेतकरी असो वा नौकरदार व्यापारी असो वा पुढारी पुरुष असो वा स्त्री गरीब असो वा श्रीमंत दिवसातील फक्त पाच मिनीटे पक्षांसाठी दयावयास हवेत. 

 प्रत्येकाने काय करावे : bird care in summer

पाण्याची सोय  - 

आपल्या घराजवळील झाडावर वा घराच्या अंगणात किंवा गच्चीवर एका पसरट शक्यतो मातीच्या भांडयात पाणी ठेवावे. मातीचे भांडे उपलब्ध नसेल तर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे भांडे चालेल पण ते सावलीत ठेवण्याची काळजी घ्यावी ज्यामूळे पाणी थंड राहील. 

या भांडयात दिवसभर पाणी राहील याची काळाजी घ्यावी कारण पक्षांना शरीराचे तापमान नियंत्रीत करण्यासाठी दिवसभर पाण्याची आवश्यकता असते. 

खाद्य / धान्याची सोय -  

या बरोबरच दुस-या एखादया उभट भांडयात किंवा कागदाच्या खोक्यात किंवा जमिनीवरही विविध प्रकारचे धान्य टाकावे. 

ज्वारी, बाजरी तांदूळ इ. प्रकारचे धान्य चालेल. 

बाजारात बर्ड फिडींग पॉट जे कुक्कुट पालन प्रकल्पात वापरतात तेही मिळतात. 

दिवसातून दोन वैळा सकाळ व तिस-या प्रहरी हे धान्य टाकावे. 

यामूळे पक्ष्यांची चाऱ्याची कामतरता भरून निघेल. 


आजारी पक्षांची काळजी कशी घ्याल :  

तसेच वाढत्या उष्णतेमुळे काही पक्षी आजारी असल्या सारखे व हालचाल न करता येण्यासारखे दिसले तर त्यांना सावलीच्या जागी ठेवावे. 

परंतू मांजरासारखया प्राण्यापासून सुरक्षीत अशा जागी ठेवावे व त्याला पाणी व चारा देण्याचा प्रयत्न करावा.

ऐवढयाच गोष्टी जर प्रत्येकाने आपल्या घरी कार्यालयात धार्मिक ठिकाणाच्या आवरात केल्या तर पहा पक्षांचा सुमधूर आवाज तुमचे मन प्रसन्न करण्यासाठी सतत हजर असेल. 

घरातील लहान मुलांना मग पक्षांचे फक्त फोटो न दाखवता प्रत्यक्ष चिऊताई दाखवून तीची गोष्ट सांगता येईल. 

एक घास कावूला व एक घास चिऊला ही कविता प्रत्यक्ष अनुभव देवून शिकवता येईल. मनाला मिळणारे समाधान तर अमुल्यचं.

धार्मिक व सांस्कृतिक शिकवण : bird care in summer

मुक्या वन्य जीवांची काळजी घेणे ही आमची जूनी संस्कृती आहे. कोणताही धर्म घ्या त्यात ही शिकवण दिलेली आहे.

हिंदू धर्मात भुतदयेचे (अमावस्या दिवशी निघणारे नाही तर मुके प्राणि व पक्षी) तत्व ख्रिश्चन धर्मातील सेवेचे महत्व बौद्ध धर्मातील दयेचा मुलमंत्र मुस्लीम धर्मातील गरजूंना मदत करण्याची शिकवण व जैन धर्मातील अहिंसेचे तत्व हे प्रत्यक्षपणे पृथ्वीवरील सर्व सजीवांची काळजी घेण्याचीच शिकवण देतात. 

धार्मिक व सांस्कृतिक परंपरा : 

पूर्वीच्या काळी आणि आजही शेतातील पिंकाची काढणी झाल्यानंतर ज्वारी व बाजरीची कणसे मंदीराशेजारील झाडाला लटकवण्याची पद्धत दिसून येते. ती उन्हाळयात चारा उपलब्ध नसताना पक्षांची गरज भागावी या हेतूनेच. 

आजही आजीबाई आपल्या नातावाला अंगणात काढलेली नखे टाकु नकोस असे सांगते. कारण पक्षांनी ते नख तांदुळ म्हणून खाल्ले तर त्याचे आतडे फाटून तो मरण्याची शक्यता असते. 

अनेक धार्मिक ठिकाणी पाणवठयांची व हौदांची सोय असते ते मुक्या प्राण्यासाठीच.

हाच आमच्या संस्कृतीचा अमूल्य वारसा पुढच्या पिढीकडे पोहचविण्याची सामाजिक कामात. पर्यावरण रक्षणात सहभागी होण्याची संधी या उन्हाळ्याने सर्वांना दिली आहे. 

सामाजिक प्रबोधन -  

  • त्यामुळे घरातील सर्व वडीलधाऱ्या मंंडळींनी मुलांना यासाठी प्रेरीत केले,  

  • शासकिय कार्मचाऱ्यांनी कार्यालयात हा उपक्रम राबवला,  

  • राजकारण्यांनी सभेतुन याविषयी प्रचार केला,  

  • वारकरी संप्रदायातील किर्तनकार व प्रवचनकारांनी हरीनाम सप्ताहात जनतेल जागरूक केले,  

  • अन सगळयात महत्वाचे शिक्षकांनी आपल्या विदयार्थ्यांना वर्गावर्गातून याविषयी माहीती दिली, 

याने काय होईल -  

तर उन्हाळ्यात या मुक्या निराधार पक्षांवरील हे संकट टळेल व पर्यावरण संरक्षणाची, समाजसेवेची व अध्यात्मिक वृत्तीची एक लोक चळवळ उभी राहील्याशिवाय राहणार नाही. 

एक आवाहन -  

यासाठी सर्व समाज घटकांनी या कामी पुढाकार घ्यावयास हवा. 

कारण पक्षी वाचले तर निसर्ग वाचेल अन निसर्ग वाचला तरच मानव.

पक्षी वाचवा ..निसर्ग वाचवा..!

.