लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब | gopinathrao munde saheb mahiti in marathi 2023

 

गोपीनाथरावजी मुंडेसाहेब - सर्वस्पर्शी लोकनेते

सर्वस्पर्शी लोकनेता


gopinathrao munde saheb mahiti in marathi


कार्यकर्त्याच्या सुखदुखात सहभागी होणारा अडीअडचणीत मदत करणारा हा नेता टिव्ही कॅमे-याच्या चौकटीपेक्षा कार्यकर्त्यांच्या घराच्या चौकटीत जाणं जास्त पसंत करीत असे.

   दिवस कसे भराभर जातात ते लक्षातही येत नाही. अजून पर्यंत मन मानायलाही तयार नाही की साहेब आपल्यात नाहीत. राजकारणाचा जेथे विषय येतो, दिनदलीत, गरीब, शेतकरी शेतमजूर यांचा जेथे विषय येतो. अन्यायाचा प्रतिकार करण्याचा जेथे प्रश्न येतो, जेथे संघर्ष येतो तेथे मुंडेसाहेबांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अन बिचार मन उगीच विनवणी करत साहेब तुम्ही हवे होतात. केलेल्या संघर्ष युद्धाचा विजय पाहण्यासाठी. जन्मभर ज्या लोंकाचा आधार बणून सेवा केली त्यांनी दिलेला आर्शिवाद पाहण्यासाठी.

  ज्याच्या नावातच नाध होता, अन् नुसत नावच नाही तर ज्यान स्वतःच्या आयुष्यातील प्रयेक क्षणाचा वापर अनाथांची ज्याचा कुणीही वाली नाही. ज्यांना स्वतःचा आवाज नाही. ज्यांना स्वतःची ओळाख नाही. अशांना सावली देण्यासाठी केला. 

 बीड जिल्हासारख्या मागास भागात जन्मलेला एका उसतोड कामगाराचा मुलगा अवघ्या महाराष्ट्रातील लोकांचा नेता होतो ही बाब सोपी नाही. विदयार्थ्यां चळवळीपासूनच सामाजिक जिवनाची सुरूवात करणा-या साहेबांनी नेहमीच सर्व सामान्यासाठी संघर्ष केला. 

ज्यांच्याकडे समाजातील कुणाचेही लक्ष नाही अशा समाज घटकांना एकत्रित करून त्यांच्या हक्कांसाठी, त्यांना न्याय देण्यासाठी साहेबांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. शेतकरी, शेतमजूर, दलीत, मागासवर्गीय, अन्यायग्रस्त अशा सर्वासांठी साहेबांनी संघर्ष केला. gopinathrao munde saheb


मराठवाडयाचा आवाज 


गोपीनाथरावजी मुंडेसाहेब

विदयार्थी दशेत असतानाच मुंडेसाहेबांनी मराठवाडा विकास परीषदेच्या माध्यमातून मराठवाडाच्या विकासाचा अनुषेश दुर करण्यासाठी लढा दिला. मराठवाडयाला विकासाबाबत मिळाणारी सापत्न वागणूक आणि त्यातून या दुष्काळी भागात निर्माण होणा-या समस्या यांची साहेबांना पुर्ण जान होती. या भागात मोठया प्रमाणात सिंचन योजना झाल्या पाहीजेत यासाठी साहेब आग्रही असत. आणि म्हणूनच १९९५ साली युतीची सत्ता आल्यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करून मराठवाडयात अनेक ठिकाणी साठवण तलाव निर्माण केले. आज त्याच पाण्यावर मराठवाडयात ऊसाचे मळे फुलले आहेत.  'gopinathrao munde saheb'

जेव्हा जेव्हा मराठावाडयावर संकटे आली, साहेबांनी सदैव विभागाला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवीला. गोदावरीच्या पुराने मराठवाडयाचे नुकसान झाले असता त्यांनी संपूर्ण भाग पायदळी तुडवत 'गोदा परीकमा करून पुरग्रस्तांच्या व्यथा सरकार दरबारी मांडल्या. २०१३ मध्ये मराठवाडयात भिषण दुष्काळ पडला होता. मराठवाडयातील सर्व गावात तिव्र पाणी टंचाई होती. तेव्हा साहेब स्वतः औरंगाबादेत उपोषणाला बसले. मधुमेहाचा त्रास असतानाही डॉक्टरांचा सल्ला धुडकावून साहेबांनी तब्बल तीन दिवस उपोषण केले. याची दखल घेवून पृथ्वीराज चव्हाणांनी खुद्द पंतगराव कदम व राधाकृष्ण विखेंना साहेबांशी चर्चा करण्यास धाडले.


विदयापीठ नामांतर लढा

  औरंगाबाद येथील मराठवाडा विछ्यापीठास जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा लढा उभा राहीला तेव्हा साहेबांनी लगेच पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून त्यात उडी घेतली. भाजपासारख्या पक्षात असतानाही की, ज्या पक्षाला उच्च वर्गांचा पक्ष म्हणून संबोधले जात होते. साहेबांनी दिलेला लढा संस्मरणीय होता. याच आंदोलनाच्या माध्यमाधून साहेबांनी पक्षाची उच्च वर्गिय ही ओळख पुसुन पक्षाला सर्वसामान्यांच्या झोपडीत घेवून जाण्याचे काम केले. gopinathrao munde saheb


बहूजनाचा कैवारी


बहूजनाचा कैवारी

  १९८४ साली झालेल्या मंडल आयोगाच्या आंदोलनात साहेबांनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला. देशात ६५ टक्के असलेल्या ओबीसी समाजाला आरक्षण व न्याय हक्क मिळावेत यासाठी हा लढा होता. साहेबांनी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाज घटकांना एकत्रित करून त्यांच्या हक्क व मागण्यांसाठी अनेकदा संघर्ष केला. मराठा. माळी धनगर वंजारी दलीत आदीवासी या समाजतील अनेक उमदया तरूणांना राजकिय आधार दिला. २०११ सालच्या जनगनणेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठी साहेबांनी संसदेत दिलेला लढा अविस्मरणीय होता.

  राजकारण बाजुला सारून साहेबांनी देशपातळीवर ओबीसी नेत्यांची मोट बांधली. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, छगण भुजबळ, शरद यादव या सर्वांचे ओबीसी जनगणनेसाठी समर्थन मिळविले. ऐवढेच नाही तर जेव्हा मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुढे आला तेव्हा त्याला खुलेपणाने सर्वप्रथम समर्थन देणारा महाराष्ट्रातील पहीला नेता म्हणजे स्व. गोपीनाथरावजी मुंडेसाहेब हे होते.


शेतकऱ्यांचा बुलंद आवाज

शेतकऱ्यांचा बुलंद आवाज

 शेतकरी आणि साहेब हे म्हणजे जिवाभावाचे नातं. साहेब भाजपाचे नेते असण्यापेक्षा शेतक-यांचे नेते म्हणून ओळखले जात. १९८५ मध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर साहेबांनी शेतक-यांच्या प्रश्नावर विविध आंदोलने केली. यात दुष्काळ ज्वारी परीषद, दुध आंदोलन, नागपुर अधिवेशनावर शेतक-यांचा महाकाय मोर्चा यांचा समावेश होता. "gopinathrao munde saheb"

१९८८ साली मुंबईत मंत्रालयावर दोन लाख शेतक-यांचा मोर्चा काढणारे साहेब पहिलेच नेते होते. त्यांनी शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी १९८९ साली चळवळ सुरू केली होती. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ गारपिट वादळ अतिवृष्टी अशी संकटे शेतक-यांवर येत तेव्हा तेव्हा शेतक-यांच्या बांधावर पोहोचणारा पहिला नेता हे साहेब असायचे.

 २०१४ सालच्या लोकसभा निवडणूकां दरम्यान गेवराई तालुक्यात गारपीट झाली. तेव्हा प्रचार सोडून साहेब गारपीटग्रस्त शेतक-यांना भेटायला गेले.


सर्वधर्मियांचा नाथ

मुंडेसाहेब ही भाजपातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अशी एकमेव व्यक्ति होती जीच्यावर कधीही जातीचा किंवा धर्माचा शिक्का बसला नाही. सर्वधर्मियांना आपूलकी वाटणरा व त्यांचे प्रश्न सोडविणारा हा एकमेव नेता होता. 

उपमुख्यमंत्री असताना साहेबांनी औरंगाबाद विदयापीठात उर्दु विभाग सुरू केला. मुंबईत हज यात्रेकरूंसाठी बांधलेली ईमारत मुस्लीम धर्मगरूंच्या मागणीनुसार एका दिवसात हज कमेटीला दिली. युतीच्या काळात राज्यात एकही धार्मिक दंगल झाली नाही. 

साहेबांनी औरंगाबाद येथील मिलींद महाविदयालयास शासनाकडून साडेतीन कोटींचा निधी दिला. विशेष म्हणजे महाविदयालयाने फक्त पंच्चेसाळीस लाखांचीच मागणी केली होती. डॉ. बाबासाहेबांनी स्थापण केलेल्या संस्थाविषयी साहेबांना विशेष ओढ होती.


सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पालक


सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पालक

साहेब म्हणजे भाजपाच्याच नव्हे तर सर्वपक्षीय तळागाळातील कार्यकर्त्यांच्या गळयातील ताईत होते. साहेबांकडे कोणतेही काम घेवून जावे आणि साहेबांनी पक्षाचा विचार न करता ते क्षणात करावे हे ठरलेलेच. राज्यातील प्रत्येका गावातील कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणारा हा एकमेव नेता. 

सत्तेत नसताना कार्यकर्त्यांची कामे करणारा नेता.. एवढेच नव्हे तर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्त्येही न होणारी कामे साहेबांकडून करवून घेत. आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहीजे. त्याला पद व प्रतिष्ठा मिळाली पाहीजे यासाठी साहेब नेहमी आग्रही असत. प्रसंगी स्वतःच्या पक्षाशीही दोन हात करायला साहेब मागेपुढे पाहत नसत. कार्यकर्त्याच्या सुखदुखात सहभागी होणारा अडीअडचणीत मदत करणारा हा नेता टिव्ही कॅमे-याच्या चौकटीपेक्षा कार्यकर्त्याच्या घराच्या चौकटीत जाणं जास्त पसंत करीत असे.


गरीबांचा मदतकर्ता

  मुलीच लग्न असो वा मुलांचे शिक्षण. . जेव्हा केव्हा पैशाची अडचण येई तेव्हा सर्वसामान्यांना आठवण येई ती साहेबांची. रात्री अपरात्री कधीही साहेबांकडे जा मदत मिळाल्याविना कुणीही परतला नाही. अनेक रुग्णांच्या महागडया शस्त्रक्रिया साहेबांनी स्वखर्चाने मुंबई पुण्याला नेवून केल्या.


साखर कारखानदारीचे तारणहार

  अडचणीत आलेली सहकारी साखर कारखाणदारी टिकविण्याचे बहुमोल कार्य साहेबांनी महाराष्ट्रात करून दाखविले. सहकारी साखर कारखानदारीचा पाया विठ्ठलराव विखे पाटलांनी घातला तर आधूनिक खाजगी साखर कारखानदारीचा पाया मुंडेसाहेबांनी घातला. युतीच्या काळात साहेबांनी ऊसाच्या झोनबंदीचा निर्णय उठवला. त्यामुळे शेतकरी व कारखानदार यांच्या अडचणी कमी झाल्या. 

खाजगी लोकांचा सहभाग घेवून साहेबांनी आजारी व तोटयात असलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. वाजपेयी सरकारकडून खाजगी कारखान्यांना परवानगी मिळवून दिली. त्यांनी कारखान्यांना विजनिर्मिती करण्याची परवानगी मिळवून दिली. 

कारखान्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वैदयनाथ कारखान्याच्या रूपाने साहेबांनी आशिया खंडात आदर्श घालून दिला. साखर कारखान्यांना भांडवली व पुर्वहंगामी कर्जासाठी आर्थिक हमी देण्यास शासनास भाग पाडले.


ऊसतोडणी कामगारांचा सरसेनापती

  साहेबांना स्वतः आवडत असणारी उपाधी म्हणजे ऊसतोडणी कामगारांचा नेता. प्रामुख्याने बीड जिल्हाचा भरणा जास्त असलेला उसतोडणी मजूर वर्षानुवर्ष वेठबिगारा सारख्या अवस्थेत होता. परंतू साहेबांनी या मजूरांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वतः संघटना स्थापन केली. शरद पवार मुख्यमंत्री असताना केलेल्या ऐतिहासिक संपाने ऊसतोड मजुरांना प्रवासखर्च व विमा संरक्षण मिळवून दिले. 

  स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री असताना साहेबांनी ऊसतोड कामगारांची बाजू घेवून संपाचे नेतृत्व केले. सत्तेपेक्षा माझा ऊसतोडणी मजुर महत्वाचा असे साहेब सांगत. या मजुरांच्या जिवनात अमुलाग्र बदल घडविण्याचे कार्य साहेबांनी केले. 

मुंडेसाहेबांनी दिनदलीत पददलीत वंचीत शेतकरी कामगार अशा समाजातील सर्व लोकांच्या जिवनाला स्पर्श करून त्यांचे जिवन उजळून टाकण्याचे कार्य केले. म्हणूनच ख-या अर्थाने साहेब 'सर्वस्पर्शी लोकनेते होते'. दिलदार आक्रमक व सामाजिक भान असणारा हा नेता आज आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही..

 

मुंडे साहेबांवरील ध्वनिचित्रफीत