शहीद दिवस - सोप्या भाषेत - Shahid diwas - Martyer Day - 23 march

शहीद दिवस -  Shahid diwas - Martyer Day - 23 march


शहीद दिवस
शहीद दिवस


'का साजरा करतात 23 मार्च रोजी शहीद दिवस'

भारत मातेचे वीर सुपुत्र भगतसिंह (Bhagat Singh), राजगुरु (Rajguru) आणि सुखदेव (Sukhdev) यांना आजच्याच दिवशी 23 मार्च 1931 रोजी इंग्रजी सरकारने फाशी दिली होती. त्यांचा बलिदान दिवस देशभरात शहीद दिन (Shaheed Din) म्हणून मानला जातो.


शहीद दिन 

म्हणजे एखाद्या राजकीय किंवा धार्मिक कारणासाठी मरण पावलेल्या किंवा मोठ्या प्रमाणात दु:ख सोसलेल्या व्यक्तींच्या स्मरणाचा आणि स्मरणाचा दिवस. “शहीद” हा शब्द ग्रीक शब्द “martys” पासून आला आहे, ज्याचा अर्थ “साक्षीदार” आहे. शहीद हे सहसा अशा व्यक्ती मानले जातात ज्यांनी त्यांच्या श्रद्धा, तत्त्वे किंवा आदर्शांच्या रक्षणासाठी आपले प्राण दिले आहेत.


'Shahid Divas' Martyrs Day  

“दिल से निकलेगी न मरकर भी वतन की उल्फत, मेरी मिट्टी से भी खूशबू-ए-वतन आएगी”

स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह (Bhagat Singh), राजगुरु (Rajguru) आणि सुखदेव (Sukhdev) यांची नावे ऐकल्यावर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा, देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा एक चेहरा येतो.

भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. 

या दिवशी त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा 'शहीद दिन' म्हणून मानला जातो. 

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव ही नावे त्यात अग्रणी आहेत.


का अटक करण्यात आले

इंग्रजी सरकारच्या 'पब्लिक सेफ्टी बिल अ‍ॅन्ड ट्रेड डिस्ट्रिब्यूशन बिल' च्या विरोधात भगतसिंहांनी सेट्रंल असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडला होता. त्यावेळी त्यांनी स्वत: ला पोलिसांच्या हवाली केलं. 

लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी इंग्रजी अधिकारी सॉन्डर्सला गोळ्या घातल्या.

नंतर या प्रकरणाचा ठपका ठेऊन भगतसिंहावर खटला चालवण्यात आला. 

काय शिक्षा झाली

या प्रकरणात भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याची अंमलबजावणी 1931 साली करण्यात आली. 

केव्हा फाशी देण्यात आली

त्यांना 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी फाशी देण्यात आली होती. हाच दिवस देशात शहीद दिन म्हणून मानला जातो. 

भगतसिंह

भगतसिंह लहान असताना 1919 साली झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी शस्त्राच्या बळावर इंग्रजी व्यवस्था उलथवून लावण्याचा प्रयत्न केला.

भगतसिंहावर रशियन राज्यक्रांतीचा मोठा प्रभाव होता. भारतातही स्वांतत्र्यांनंतर समाजवाद रुजला जावा यासाठी ते प्रयत्नशील होते. ते केवळ एक क्रांतीकारक नव्हते तर एक विचारक देखील होते. त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली.


Martyer Day

जिंदगी तो अपने दम पर जी जाती हैं, दुसरो के कंधो पर तो सिर्फ जनाजे उठे हैं।”- भगत सिंह


शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले,वतन पर मरने वालों का यही बाकी निशा होगा”


सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाजु-ए-कातिल में है