गुढीपाडवा [ Gudhi padava information - sopya bhashet] मराठी नूतन वर्ष

गुढीपाडवा माहिती - सोप्या भाषेत 

गुढीपाडवा माहिती - सोप्या भाषेत


गुढीपाडवा ( Gudhi padava ) - 

गुढीपाडवा_Gudhi padava_मराठीनववर्ष

चैत्र हा हिंदू संस्कृतीच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना आणि पहिल्या महिन्यातला पहिला सण म्हणजे " गुढीपाडवा ". 

Gudi Padwa चैत्र महिना हा हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा हिंदू संस्कृतीत नववर्षाचा पहिला दिवस आहे. या तारखेपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. या दिवशी गुढीपाडव्याचा सण देखील साजरा केला जातो. मराठी समाजासाठी गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो. 

गुढीपाडवा विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो. यामध्ये 'गुढी' म्हणजे 'विजय ध्वज' आणि 'पाडवा' म्हणजे 'प्रतिपदा' तिथी. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजवली जाते.

गुढीपाडवा (Gudhi padava) - मराठी नूतन वर्ष 

 ह्या दिवशी पासून नवीन मराठी वर्षाला सुरुवात होते. ह्या दिवशी बांबूची उंच काठी रेशमी खणाने किंवा वस्त्राने , रेशमी साडीने सजवतात. त्यावर चांदीचे किंवा तांब्या - पितळेचे पात्र ठेवले जाते. हार, गाठी, कडूलिंबाची डहाळी त्याला लावली जाते. अश्या तयार केलेल्या गुढीची पूजा करतात आणि ती अंगणात, खिडकीत किंवा टेरेस वर उभारली जाते. 


गुढीपाडवा ( Gudhi padava ) - ऐतिहासिक पार्श्वभूमी - (historical background) 

ह्या सणामागे एक कथा आहे ती अशी कि , चेदी नावाचा एक देश होता. तेथें वसू नावाचा राजा राज्य करीत होता. मोठा गुणी आणि धार्मिक होता तो. त्याच्या राज्यात प्रजा सुखी, समाधानी होती. पण पूढे त्याच्या मनात विरक्तीचे विचार आले. त्याने राजवाडा सोडला, राज्य सोडले; आणि तो अरण्यात गेला व तपश्चर्या करू लागला. त्याची घोर तपश्चर्या पाहून देव प्रसन्न झाला. त्याने राजाला वैजयंतीमाळा, विमान आणि वेळूची एक काठी दिली आणि सांगितले ," राजा, परत आपल्या राज्यात जा, सुखाने राज्य कर. प्रजेला सुखी ठेव. ही पूजाच मला आवडेल. आपले कर्तव्य मन लावून करणे , प्रामाणिकपणे करणे, हीच परमेश्वराची पूजा आहे. तेव्हा आपले कर्तव्य कर ! ". परमेश्वराच्या कृपेने राजाला आनंद झाला. त्यांची आज्ञा मानून तो आपल्या राज्यात आला. परमेश्वर प्रसन्न होऊन राजाला प्रसाद दिला , त्या दिवसाची आठवण ठेवण्याकरिता राजाने त्या वेळूच्या काठीला सजविले , तिची पूजा केली , ती या दिवशी ! आणि तेव्हापासून गुढीपाडव्याचा सण प्रचारात आला असे मानले जाते. 

गुढी पाडव्याच्या दिवशीच प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपवून आयोध्याला परत आले.

दुसरी कथा अशी की ह्याच दिवशी श्रीरामांनी बालीचा वध केला. आणि त्याच्या जाचातून प्रजेची सुटका केली, तीही ह्याच दिवशी! त्यामुळे या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा पडली, असे मानतात. 

ब्रम्हदेवाला सृष्टीची निर्मिती करावीशी वाटली आणि या कार्याला त्यांनी सुरुवात केली, तीही याच पवित्र दिवशी. 

गुढी पाडवा म्हणजे संवत्सर प्रतिपदा, ( संवत्सर म्हणजेच वर्ष ) वर्षाचा पहिला दिवस. शालिवाहन शकाची सुरुवात ! पूर्वी पैठण येथे सात वाहनांचे - शाली वाहनांचे राज्य होते. त्या काळी ' शक ' म्हणजे परकीय सर्व राज्यात धुमाकूळ घालीत होते; प्रजेला छळत होते. शालिवाहनांनी शकांवर मिळविलेल्या विजयापासून हा शक सुरु झाला.


'गुढीपाडवा ( Gudhi padava )' - 'साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त' 

गुढी पाडव्याला आपण साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त मानतो. मुहूर्त म्हणजे शुभ दिवस. ( हिंदू संस्कृतीतील हे साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा एक. विजयादशमी किंवा दशहरा / दसरा एक. कार्तिक शुद्ध प्रतिप्रदा किंवा बलिप्रतिपदा - दिवाळीतला पाडवा एक आणि वैशाख शुद्ध तृतीया किंवा अक्षय्य तृतीया , या सणाला अर्धा मुहूर्त मानतात ) 


गुढीपाडवा ( Gudhi padava ) स्वरूप-

चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.

उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, 

गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. 

दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. 

यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा,  दिल्या जातात. 

चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. 


'गुढीपाडवा ( Gudhi padava ) - आरोगी दृष्ट्या महत्व' 


चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ,  हिंग, मिरी आणि  साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात.

 पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते.

 शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.

चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते आणि वातावरणात बदल झालेला असतो. जुनी वाळलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, तर आंब्याला मोहोर येतो. या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळे हा सण साजरा केला जातो. गुढीला सजवण्यात येणार्‍या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे.

गुढी_मागील_शास्र

वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातो. तर  या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे.


 कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. 

होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते. या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी-पडशांसारखे विकार फोफावण्याची शक्यता असते. अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने करतात.

गुढीपाडवा ( Gudhi padava ) - सामाजिक परंपरा

  • गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालतात, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे.
  • या मंगलदिनी विविध ठिकाणी पहाटेच्या सांस्कृतिक मैफिली उत्साहाने आयोजित केल्या जातात. रसिकांचा वाढता प्रतिसाद दिवाळी पहाट, नववर्ष पहाट व गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्ष पहाट या उपक्रमाला मिळत आहे
  • गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृृतीची झलक दाखविणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात. महिला, पुरुष, लहान मुले पारंपरिक पोशाखांत या मिरवणुकीत सहभागी होतात.

  • गुढी पाडवा पक्वान्न  Gudi Padwa Recipe 
गुढीपाडवा हा खास महाराष्ट्रीयन पदार्थांसाठीही ओळखला जाणारा सण आहे. 
या दिवशी श्रीखंड-पुरी, खीर-पुरी, बासुंदी-पुरी, भाजी-पुरी, पुरणपोळी, मसालेभात, कोशिंबीर, चटण्या, लोणचे, पापड, आलू वड्या, बत्तावडे असे खाद्यपदार्थ खास मराठी पध्दतीने तयार केलं जातात. 

या प्रकारे उभारावी गुढी 
गुढीची उंच काठी बांबू पासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचे गडू, तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते. ज्या भागाला गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुऊन पुसून घ्यावी. त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवली जाते. तयार केली गुढी दारात, उंच गच्चीवर, गॅलरीत लावतात.
गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करतात.
 
गुढीपाडवा पूजा विधी 
गुढी उभारल्यावर गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करतात. निरंजन लावून उदबत्ती ओवाळतात. दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीस परत हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून गुढी उतरविली जाते.

"गुढीपाडवा ( Gudhi padava ) - लोकगीत" 


गुढी पाडव्याला उंचे गुढी उभवावी
कुळाची कीर्ती जावी दाही दिशा ॥२४॥

गुढी पाडव्याला गुढी उंच उभी करी
खण घाली जरतारी गोपूबाळ ॥२५॥

गुढी पाडव्याला कडुलिंब खाती
आधी कडू मग प्राप्ती अमृताची ॥२६॥

गुढी पाडव्याला घरोघरी गुढी
पडू दे माझी कुडी देवासाठी ॥२७॥

पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
चांदीची वर लोटी गोपूबाळाची ॥२८॥

पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
कुळाची कीर्ती मोठी बाप्पाजींच्या ॥२९॥

पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
वर खण जरीकाठी उषाताईचा ॥३०॥

 
गुढीपाडवा आरती Gudi Padwa Aarti
गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा ही तिथी,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
विश्व निर्मिती ब्रह्म करीतो, ब्रमहपुराणी असे,
अयोद्धेसी वनवासाहुनी राम पुन्हा परतसे,
गुढ्या-तोरणे रांगोळ्यांनी स्वागत ते करीती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
माधव तसे मधुमास ही वेदातील ही नावे,
पंचांगाचे पूजन सर्वही करती मनोभावे,
सरस्वतीस गंध अन पाटी ही पुजिती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
साखरमाळ कडुलिंबाची पाने फुलमाळा,
गडु चांदीचा रेशमी वस्त्र कुंकू ,केशर , टिळा,
आदराने ब्रह्मध्वज या गुढीस संबोघिती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
पिशाच्च जाई दूर पळुनी कडुलिंबाचा टाळा,
कडू रसाचे सेवन करूया गूळ जिरे घाला,
गुढीपाडवा सण हा पहिला वर्षाचा करीती
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
गुढी उभारू चैत्र मासि प्रतिपदा ही तिथी
आरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णू किती
 
Gudipadva
Gudipadva

चला उभारूया समृद्धीची, शांततेची, सौहार्दाची, समभावाची, बंधुभावाची गुढी...
मराठी नववर्षाभिनंदन!!!