Mental health - काळजी | चिंता | anxiety

 

 मानसिक आरोग्य - काळजी कशी दूर कराल?

काळजी
काळजी

“काळजी घ्यावी, काळजी करू नये'', '

“चिता मेलेल्या माणसाला जाळते तर॒ चिंता जिवंत माणसाला जाळते'', '

“मन चिंती ते वैरी न चिंती '' 

यांसारखे वाकप्रचार आपण नेहमी वापरतो . काळजी हा कर्करोगापेक्षाही असाध्य रोग आहे. हे त्यातून सूचित होते . 

सर्वेक्षण व संशोधन निष्कर्ष काय सांगतात 

अलीकडे विमा कंपनीला रुग्णांच्या बाबतीत पाचापेकी चार रोगी हे प्रत्यक्ष घटनेपेक्षा तिच्या काळजीनेच अधिक ग्रस्त असतात असे आढळून आले आहे.

न्यूयॉर्कमधील मेयो हॉस्पिटलमध्ये ३५ टक्के रुग्णांच्या आजारांचे कारण काळजी असते, असे दिसून आले . 

आरोग्यावर परिणाम 

काळजीचा दुष्परिणाम हृदयाचे स्पंदन , रक्ताभिसरण , निरनिराळ्या ग्रंथीतून वाहणारा स्त्राव व एकूण केंद्रीय मजासंस्था यांच्यावर होऊन आरोग्याची हानी होते.

मनाची अवस्था

काळजी ही मनाची अवस्था असल्यामुळे ती दूर करण्यासाठी बाह्य परिस्थितीपेक्षा वृत्तीत, विचारात बदल झाला पाहिजे . काळजीचे तार्किक विश्लेषण केल्यास तिचे अस्तित्व उरत नाही .

 सगळ्यात वाईट काळजी म्हणजे अज्ञानाचे भय. म्हणून आपला शत्रू कोण आहे ते प्रथम निश्चित करा . तरच त्याच्यावर हल्ला करता येईल . काही माणसे किरकोळ व क्षुल्लक गोष्टींनी हैराण होतात . या चिंतातुर-जंतूंचा दृष्टिकोन सदैव नकारात्मक व निराशावादी असतो . त्यामुळे रात्रंदिवस ते काळजीमग्न असतात .

एका विचारवंताने स्वतःच्या काळजीचे कोष्टक तयार करून पुढीलप्रमाणे वर्गीकरण व विश्लेषण केले आहे.

१. ज्या दुर्घटना प्रत्यक्षात कधीच घडत नाहीत अशा संभाव्य दुर्घटनांची काळजी -  ४० ट्क्के.

२. आजार व रोग यांची काळजी - २० टक्के

३. ज्यांच्याबद्दल आता काहीच करणे शक्‍य नाही अशा भूतकाळात घडलेल्या गोष्टींची काळजी - ३० टक्‍के.

४. ज्यांना प्रत्यक्षात आधार आहे अशी काळजी - १० टक्के . 

तेव्हा काळजीचा पर्वत पोखरला तर शेवटी त्यातून उंदीरच बाहेर पडतो .

दुसऱ्या एका विनोदी लेखकाने काळजीचे विभाजन करून काळजी कशी अस्तित्वातच नसते हे सिद्ध करून दाखविले . त्याच्या युक्तिवादाचा क्रम असा होता की, 

काळजी नेहमी दोन गोष्टींची असते . 

एक तर तुम्ही निरोगी असाल किंवा आजारी असाल.

निरोगी राहिलात तर काळजीचे कारण उरत नाही . आजारी पडलात तर दोन गोष्टींचीशक्‍यता असते . 

तुम्ही बरे व्हाल किंबा तुम्हाला मृत्यू येईल! 

बरे झालात तर ते बरेच

मृत्यू झाल्यास स्वर्गात तरी जाल किंवा नरकात तरी पडाल . 

स्वर्गात गेलात तर बरेच.

नरकात पडलात तर तुम्हाला तेथे इतके मित्र भेटतील काळजी करायला वेळच मिळणार नाही. 

करतो . 

रस्त्याने जाताना ठोकर मारून धूळ उडाली म्हणजे दिसत नाही, अशी तक्रार करण्यासारखाच हा प्रकार आहे. 

आपल्या बहुतेक विवंचना निराधार असतात . ज्या थोड्या खऱ्या असतात त्यांचे निराकरण करणे सहज संभव आहे . 

काळंजीशी दोन हात करण्यासाठी मानसशास्त्राच्या अभ्यासकांनी पुढीलप्रमाणे अनेक सूचना केलेल्या आहेत.

१. विधायक दृष्टिकोन जोपासा :

भगवदगीतेच्या निष्काम कर्मयोगात काळजीवरचा उतारा आहे. कर्म करा “पण कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका. मानसशास्त्रीय

दृष्टिकोनातून दुसरे लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका.

२. एका वेळी एकच गोष्ट हाली चच परि एका वेळी एकच गोष्ट हाती घ्या :

 रशियन शास्त्रज्ञ 'पॅव्हलॉव्ह यांच्या अभिजात अभिसंधान प्रयोगातील कुत्रा जसा घंटानाद झाल्यावर अन्न मिळप्णार म्हप्पून अभ्मिसंधित

होतो, तशी आपल्नी बहुतेक व्हाळजी असपेक्षांनी निर्माप्ण होतात . त्यामुळे “एक ना धड

आराभर चिंध्या' अशी अवस्था निर्माण होते . म्हप्णून महत्त्वाच्या कार्यावर लक्ष केंद्रित

करा. काही लोक एकाच वेळेस अनेक गोष्टी हाती घेतात . उद्याच्या व्छहामांचे आज

चियोजन जरूर करा पप्ण उद्या येईपर्यंत वाट पाहण्यासाठी शिक्का . नाही तर नाहक वेळेचा

व शक्तीचा अपव्यय होतो . टेल्ीप्होनची ब्ेल्ल वाजत असूनही आपप्ण व्छाही बेळ तिच्याकडे

दुर्लक्ष करतो . त्याप्रमाणे मनातला थोडीशी शिकवप्ग द्या. मनाच्या व शरीराच्या

शिथिल्तेसाठी श्वसन खूप उपयोगी पडते .

३. दुसऱ्यांना संधी द्या :

 चिंताग्रस्त व काळजीग्रस्त तलोकांना प्रत्येक गोष्ट स्पर्धा

वाटते व तिचा विचार ते अहंकेंद्री दृष्टिकोनातून करतात . बसमध्ये जागा न मिळणे,

सिनेमाचे तिकिट न मिळणे , यांसारख्या किरकोळ गोष्टींतही ते नशिबात्ना बोल्न तल्लावतात .

थोडेसे सब्ुरीने घ्यावयास शिकणे महत्त्वाचे आहे . तत्त्वनिष्ठा व्हायम ठेवूनही व्यवहारात

तडजोड करता येते .

४. राग आवरा :

आजचे काम उद्यावर ढकत्नणे केव्हाही वाईट. पप्ण रागाच्या

" बाबतीत मात्र ते चांगले . *“राग आल्यावर अविवेकाने त्नगेच निर्प्पय न घेता, मध्ये थोडा

बेळ जाऊ द्या. आत्मपरीक्षणाने रागाची तीच्लता कमी होते'' डुसऱर्‍्याच्या डोळ्यातील

व्छुसळही दिसते पण्ण स्वतःच्या डोळ्यातील्न मुसळ दिसत नाही. म्हप्णून सदोदित डुसऱ्याचे

दोष दाखविण्यापेक्षा त्याचे गुप्ग शोधून त्यांची प्रशंसा करा. त्यामुळे जुम्हात्ना व त्यातला

दोघांनाही समाधान त्ल

५ . फुरसतीचा वेळ नीट घात्नवा : 

“रिकामे मन सैतानाचे छर। '' मनाच्या पोतडीतून

जाडूगार दाखवतो त्याप्रमाणे काय काय वस्तू निघतीत्ल त्याचा भरवसा नसतो. . म्हप्णून

“*“काय करावं बुवा, वेळ अगदी जात नाही . दिवस नुसता खायत्ना उठल्पा आहे '' असे

उद्गार म्हणजे काळजी , चिंता यांची नांदीच होय . फुरसतीच्या वेळात एखाद्या कलेला

किंवा छंदात्ला वाटून घ्या .


६. समतोल साधा :

बऱयाच जप्णांना आपण दुर्लक्षिले जातो , उपेक्षिले जातो अशी

अावना असते . त्यामुळे ते एकत्नकोंडे जीवन जगतात . माण्ूसघाणेपप्णा किंवा उठसूठ

डुसऱ्याची उठाठेव यापैकी कोप्णताच एकांगीपणा बरा नव्हे. आत्यंतिक टोके टाळून

मध्यम मार्ग व्छाळजी टाळण्याच्या दृष्टीने श्रेयस्कर व सोयीस्कर ठरतो . आपल्ली पात्रता व

मर्यादा ओळखून अपेक्षा ठेवाव्यात . *“ठेविले अनंते तैसेची रहावे '' या तुकारामाच्या

उत्ततीत हाच भावार्थ आहे. आवडीचे व्छार्य मिळाले नाही तर जे व्छार्य म्रिळाले आहे

त्याच्यात आब कशी निर्माण होईल ते पाहा . जशी माणसाची ष्टी तशी सुखाची

किंवा दुःखाची वृष्टी त्याच्यावर होत असते . म्हणूनच डॉ. राधाकृष्णन्‌ यांच्यासारखे

विचारवंत म्हणतात , '*घटना आपण बदलू शकत नाही पण घटनाविषयक दृष्टिकोन

आपण बदलू शकतो .

७. बोलून दाखवा :

 ज्या वेळेस एखादी गोष्ट त्रास देईल त्या वेळेस ती कोंडून ठेवू नका. मनातल्या मनात कुदू नका . तुमची भीती किंवा काळजी प्रिय, समंजस , विचारी व विश्वासार्ह व्यक्तीजवळ बोलून दाखवा . त्यामुळे मनावरील ताण दूर होईल व थोडेसे मार्गदर्शन पण मिळेल . *'थांबा व सहन करा'' यापेक्षा क्षणभर दुसरीकडे वळून मन

रमवा . कामात बदल म्हणजे विश्रांती . विश्रांती म्हणजे मनाला शांती . मनाला शांती

म्हणजे काळजीला मूठमाती .

जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणिमात्राला चिंता, दुःख , काळजी अनुभवावीच लागते .

त्यांच्यापासून पूर्णपणे सुटका नाही व ते आवश्यकही नाही . रक्षणात्मक अशा त्या

प्रतिक्रिया आहेत; परंतु आपल्या मालक बनून आपले शोषण व भक्षण त्या करत नाहीत

ना! हे पाहणे किंवा तशी काळजी घेणे म्हणजेच काळजीमुक्त होणे .