स्मार्टफोनवरून मिनिटात लिंक करा Aadhaar-PAN | 30 जून शेवटचा दिवस


link Aadhaar-PAN


Aadhaar-PAN

पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रं आहेत. ओळखीचा पुरावा बरोबरच अनेक ठिकाणी या कागदपत्रांचा गरज पडते. 

सरकारने PAN आणि Aadhaar Card लिंक करणे अनिवार्य केले आहे. तुम्ही जर आतापर्यंत ही दोन्ही कागदपत्रं लिंक केली नसल्यास ३0 जून ही शेवटची तारीख आहे.

३0 जून ही शेवटची तारीख

 आधार – पॅन कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया खूपच सोपी असून, तुम्ही घरबसल्या मिनिटात हे करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही सेटमध्ये जाण्याची गरज नाही. ३0 जूनपर्यंत आधार – पॅन लिंक न केल्यास पॅन कार्ड काम करणार नाही.

अधिकृत वेबसाइट

पॅन कार्ड चालू राहण्यासाठी कागदपत्रं त्वरित लिंक करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. www.incometax.gov.in या वेबसाईटवर जाऊन पॅन व आधार लिंक करू शकता.

स्मार्टफोनवरून मिनिटात लिंक करा Aadhaar-PAN

 वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला 
1. क्विक लिंकमध्ये Link Aadhaar या पर्यायावर जावे लागेल. हा पर्याय तुम्हाला वेबपेजच्या उजव्या बाजूला दिसेल. 

2. यावर टॅप केल्यानंतर पॅन नंबर, आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.

3. आता तुम्हाला लिंक आधार हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. 

4. यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आधार व पॅन कार्ड लिंक होईल. 

5. जर तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड आधीपासूनच लिंक असल्यास तुम्हाला एक मेसेज दिसेल. ज्यात कागदपत्रं लिंक असल्याचे सांगितले जाईल. 

6. तसेच, तुम्ही आधीच आधार कार्ड व पॅन लिंक करण्याची रिक्वेस्ट केली असल्यास उजव्या बाजूला दिलेल्या Link Aadhaar Status वर क्लिक करून माहिती पाहू शकता. 

7. यानंतर आधार व पॅन नंबर देवून View Link Aadhaar Status वर क्लिक करा. 

या पध्दतीने तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. 

PAN आणि Aadhaar Card लिंक करण्याची शेवटची तारीख ३0 जून आहे. याआधी देखील सरकारने कागदपत्रं लिंक करण्याची तारीख अनेकदा वाढवली आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण गरजेचे आहे.