उन्हाळ्यासाठी थंड पेय | health drinks in summer

 उन्हाळ्यासाठी थंड पेय

उन्हाळ्यासाठी थंड पेय

उन्हाळ्यात खालील पेयांची वापर आरोग्यदायी ठरतो,

सरबते - 

साध्या पाण्यात लिंबू आवळा कोकम वाळा यांचे सरबत, कैरीचे पन्हे.

(सर्वामध्ये आल्याचा थोडा वापर करावा.)


* शहाळ्याचे पाणी, बर्फ न घालता उसाचा रस. 

ताक

* धने व जिरे पावडर घातलेले ताक.

दूध 

* दुधाचा मसाला घालून साधे थंड दूध. 

लोणी

* घशाला शोष लागला असेल तर थंड दूधात घरचे लोणी विरघळून प्यावे. 

खडीसाखर व गूळ

* खडीसाखर किंवा गुळाचा खडा चघळून वर पाणी प्यावे.

अंबा रस

* आंब्याच्या मोसमात सायीसकट दूध, आंब्याचा रस, खडीसाखर व वेलची पूड मिक्सरमध्ये एकत्र करून (फ्रीजमध्ये न ठेवता) प्यावे.

दूधाचे आइस्क्रीम

* उन्हाळ्याच्या सुरुवातीला (मार्च, एप्रिल) कोणत्याही प्रकारातील आइस्क्रीम किंवा कोल्ड्रींक्स टाळावीत. 

* नुसत्या दूधाचे आइस्क्रीम मे आणि जूनच्या पहिल्या १५ दिवसात चालू शकेल. 

* पण जेवणानंतर लगेच आइस्क्रीम खाणे टाळावे. 

* खायचेच असेल तर जेवण व नाश्ता यांच्या मधल्या काळात किंवा जेवण झाल्यावर किमान दीड ते दोन तासांनी खावे. 

* आइस्क्रीम थंड असल्याने पचनक्रिया मंदावते. 

बाजारातील सरबते

* बाजारात मिळणारी तयार सरबतेही चालतील. मात्र साध्या किंवा माठाच्या पाण्यातून प्या. 

फळांचे रस

* आपल्यासमोर काढून दिलेले फळांचे ताजे रस चालतील. मात्र त्यात बर्फ घालू नका. ते आंबट नाहीत, याची खात्री करून घ्या.


health drinks in summer