एप्रिल फुल म्हणजे काय | april fool mahiti marathi

एप्रिल फुल दिवस

April fool divas
April fool divas

दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस जगभरात 'एप्रिल फुल दिवस' (April Fool's Day) म्हणून साजरा केला जातो.

 या दिवशी लोक एकमेकांसोबत विनोद, मस्ती करतात, चेष्टा करतात. आजकाल लोक सोशल मीडियाच्या मदतीने या दिवसाचा खूप आनंद घेतला जातो. 

मित्र, नातेवाईकांना 'एप्रिल फुल्स डे'वर मजेदार मीम्स, जोक्स आणि शायरी पाठवतात. 

मात्र तुम्हाला एप्रिल फुल्स डे साजरा करण्यामागचं कारण माहिती आहे का? 

एप्रिल फुल डे - इतिहास

एप्रिल फुल डे साजरा करण्यामागे दोन कथा प्रचलित आहेत.

 पहिली कथा

इंग्लंडचा राजा रिचर्ड द्वितीय आणि बोहेमियाची राणी ऍण्नी यांनी 32 मार्च 1381 रोजी त्यांच्या लग्नाची घोषणा केली. लग्नाच्या बातमीने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण होते. 

मात्र, कॅलेंडरमध्ये 32 मार्च ही तारीख नसते. 

राजा-राणीने लग्नाची खोटी माहिती देऊन लोकांना मूर्ख बनवले होते, तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. 

32 मार्च हा दिवस नाही म्हणून 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फूल डे म्हणून साजरा करण्यात आला.

दुसरी कथा

एप्रिलफुल दिवसाची सुरुवात फ्रान्समध्ये झाली .

तेरावे पॉप ग्रेगरी यांनी 1582 रोजी युरोप च्या सर्व देशाला ज्युलियन कॅलेंडर ऐवजी ग्रेगरियन कॅलेंडर वापरण्यास सांगितले ! 

त्या आगोदर ज्युलियन कॅलेंडर  मध्ये 1 एप्रिलला नवीन वर्ष साजरे केले जात असत, परंतु नवीन ग्रेगरियन कॅलेंडर नुसार 1एप्रिल ऐवजी 1 जानेवारी ला नवीन वर्षे साजरे करण्यास पॉप ग्रेगरी यांनी सांगितले. 

परंतु वर्षानु वर्षा पासून चालत आलेली परंपरा मोडण्यास युरोपियन लोक तयार नव्हते त्या मुळे त्याचा बऱ्याच लोकांनी विरोध केला , आंदोलने केली. 

त्यामुळे बरेच युरोपियन लोक 1 एप्रिलाच नवीन वर्ष साजरे करत ,आणि जे 1 एप्रिल ला नवीन वर्ष साजरे करत त्या सर्वांना मूर्ख समजले जायचे. 

हळूहळू फ्रांस ची एप्रिलफुल ची गोष्ट पूर्ण जगात सर्वत्र पसरली आणि तेव्हा पासून 1 एप्रिल हा दिवस एप्रिलफुल दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात झाली .

'April Fools divas'

कोठे साजरा करतात - 

 सुरवातीला हा दिवस फक्त फ्रान्स आणि अन्य युरोपीय देशांमध्ये साजरा केला जायचा पण नंतर अन्य देशांमध्येही हा दिवस साजरा केला जातो. एप्रिल फूल डे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेट केला जातो.  

 April Fool divas एप्रिल फूल दिवस


भारतातही एप्रिल फूल

 उत्साहाने साजरा केला जातो. अनेकजण आपले मित्र मैत्रीणी, नातेवाईक, कुटूंब यांच्यासोबत एप्रिल फुल दिवसानिमित्त गम्मत जम्मत करतात. 

खोट्या गोष्टी सांगून त्यांना मुर्ख बनवतात आणि एप्रिल फुल च्या शुभेच्छाही देतात. 

अशा प्रकारे खोटे बोलून लोकांना वेड्यात काढुन, मूर्ख बनवून वरून त्यांना शुभेच्छा देणारा हा आगळा वेगळा दिवस साजरा केला जातो.