उष्माघात - कारणे व उपचार | heat stroke mahiti in marathi

       उष्माघात : कारणे व उपचार

उष्माघात  

वातावरणातील बदलामुळे दैनंदिन तापमानात वाढ व जास्त प्रखर उष्मालहरी, जागतिकस्तरावर अनुभवास येत आहेत. 

  प्रखर उष्माघाताचा आपल्या देशात परिणाम दिसतो. जेव्हा प्रत्यक्ष कमाल तापमान 45 डिग्री सेल्सियस इतके नोंदविले जाते तेव्हा उष्मालहर आहे असे मानले जाते.

'उष्माघात' होण्याची कारणे -

1. उन्हामध्ये शारिरीक श्रमाचे, मजूरीचे कामे फार वेळ करणे,

2. कारखान्याचे बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील काम करणे,

3. जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे

4. घट्ट कपड्यांचा वापर करणे

5. उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे.

 उष्माघाताची लक्षणे-

1. शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे

2. थकवा येणे, ताप येणे (102 पेक्षा जास्त) त्वचा कोरडी पडणे

3. भुक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे,डोके दुखणे 

4. रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन, अस्वस्थ, बेशुध्द अवस्था इत्यादी,

5. उलटी होणे.


उष्माघात - जोखीमेचा गट

1. वय पेक्षा 5 पेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा जास्त

2. कष्टाची सवय नसणारे लोक, धुम्रपान, मद्यपान करणारे आणि कॉफी पिणारे व्यक्ती

3. मुत्रपिंड, हद्यरोग, यकृत, त्वचा विकार,

लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब इ. रुग्ण

4. diuretics, anti allergic, trangilizers, stimulants etc या औषधींचे सेवन सुरु असलेले रुग्ण.

5. जास्त तापमान, अति आर्द्रता, वातुनुकलनाचा अभाव 

6. तंग कपडे, शेत काम, कारखान्यातील काम, ऊन आणि उष्णतेशी संबधीत व्यवसाय करणा-या व्यक्ती

उष्माघात - प्रतिबंधात्मक उपाय

1. वाढत्या तापमानाच्या वेळेत कष्टाची कामे टाळणे,

2. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावी.

3. उष्णता शोषून घेणारे कपडे उदा. काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरु नयेत, सैल व उष्णता परावर्तित करणारे पांढ-या रंगाचे कपडे वापरावेत.

4. जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे.

5. उन्हामध्ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी.

6. शक्यतो उन्हात फिरण्याचे टाळावे. आवश्यक कामे असल्यास उन्हात जाण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे किंवा लिंबू शरबत प्यावे.

7. उन्हात जाण्याअगोदर जेवण करावे, रिकाम्या पोटी उन्हात जावू नये

8. कान व डोक्याचा उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे. डोक्याभोवती पांढरा रुमाल गुंडाळावा. गॉगल्स व हेल्मेट वापरावी.

9. वृध्दांना व बालकांना उन्हात फिरु देऊ नये.

 उष्माघात -  झाल्यास काय करावे

1. तहान नसली तरी भरपूर पाणी/सरबत प्यावे

2. हवा खेळती ठेवण्याकरिता पंख्यांचा वापर करावा.

3. सैल व सौम्य रंगाचे सुती कपडे वापरावेत

4. सावलीत थांबणे, हळुवार चालावे, टोपी चष्मा वापरणे, मजूर वर्गास वारंवार विश्रांती घेवु द्यावी, उन्हातून आल्यावर चेहऱ्यावर ओले कापड ठेवावे.


उष्माघात - काय टाळावे

1. मद्य, सोडा, कोफी, अतिगार पाणी इ पिणे

2. गरज नसताना उन्हात बाहेर फिरणे

3. तंग व गडद कपडे वापरणे

4. अति व्यायाम करणे

5. बंद कार मध्ये बसणे

6. अति शारीरिक कष्टाचे काम करणे 

उन्हाळ्यातील आहार-विहार कसा असावा हे जाणून घ्या..